नागपूर : पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या कोर ग्रुप सदस्य आहेत. त्या नाराज मुळीच नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते म्हणाले की पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण ऐकलं आहे. त्यांनी भाजप बद्दल आपले वक्तव्य केलेले आहे, की भाजप नेहमी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. प्रत्येकवेळी त्यांच्या वक्तव्याच्या विपर्यास करणे हे योग्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
जनसंपर्क अभियानात सहभागी :पंकजा यांच्या वक्तव्यांमध्ये कुठली उद्विज्ञता वाटत नाही, त्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. जनसंपर्क अभियानात सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या 15 च्या वर सभा लागल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही काहीतरी विषयाला घेऊन महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल संभ्रम तयार करणे योग्य नाही. मी त्यांच्यासोबत बोलतो. देवेंद्र फडणवीस यांची देखील चर्चा सुरू असते असा दावा त्यांनी केला आहे.
म्हणून विरोधकांना ओबीसी मेळावा घ्यावा लागतोय:सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ओबीसाठी काही काम केले नाही. म्हणून त्यांना ओबीसी मिळावे घेण्याची वेळ आली आहे. जेव्हा सत्तेमध्ये होते, तेव्हा केंद्रात, राज्यातही काही केले नाही. आता ओबीसीचे केवळ मत पाहिजे म्हणून याप्रमाणे ओबीसी समाजाचे मिळावे घेण्याचे ढोंग आहे, नौटंकी आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.