महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई सायबर हल्ल्यासंदर्भात उर्जामंत्र्यांनी खोटा अहवाल विधानसभेत मांडू नये- बावनकुळे - मुंबई ब्लॅकआउट लेटेस्ट न्यूज

आपली वीज ट्रान्समिशन व्यवस्था सायबर हल्ला होण्याइतक्या आधुनिक नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच केंद्रालासुद्धा या कथित सायबर हल्ल्याची कुठलीही माहिती नसल्याचे ते म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Mar 3, 2021, 6:54 PM IST

Updated : Mar 3, 2021, 7:17 PM IST

नागपूर-वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्समिशन व्यवस्थेवर सायबर हल्याच्या संदर्भात उर्जामंत्र्यांनी खोटा अवहाल विधानसभेत मांडू नये, असे आवाहन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत झालेल्या ब्लॅकआउट मागे चिनी सायबर सेलचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बावनकुळे यांनी गृहमंत्री साफ खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता.

उर्जामंत्र्यांनी खोटा अहवाल सभागृहात मांडू नये

१२ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या ब्लॅकआऊट मागे चायनाचा सायबर हल्ला होता, अशी माहिती गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी दिली होती. मात्र, यामागे सायबर हल्ला नाही तर मानवी तांत्रिक चूक जबाबदार असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानेसुद्धा हा सायबर हल्ला नसल्याची माहिती दिली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच केंद्रालासुद्धा या कथित सायबर हल्ल्याची कुठलीही माहिती नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे उर्जामंत्र्यांनी खोटा अहवाल सभागृहात मांडू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

ट्रान्समिशन लाईन्स आधुनिक नाहीत
आपली वीज ट्रान्समिशन व्यवस्था सायबर हल्ला होण्याइतक्या आधुनिक नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. सर्व कामकाज हे मॅन्युअलीच केले जाते. केवळ आपली चूक दुसऱ्यांना दिसू नये, याकरिता मंत्र्यानी अशा प्रकारे खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करणे हे अत्यंत गंभीर असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Last Updated : Mar 3, 2021, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details