नागपूर- संघप्रमुखांनी मैदानात येवून निवडणूक लढवावी. लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवू नये. स्वतः मैदानात यावं, संघावर बंदी येईल तेव्हाच मनुवाद संपेल, असे वक्तव्य भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केले आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात नागपुरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आझाद बोलत होते.
संघावर बंदी येईल तेव्हाच मनुवाद संपेल - चंद्रशेखर आझाद - नागपूर जिल्हा बातमी
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात नागपुरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रशेखर आझाद बोलत होते.
चंद्रशेखर आझाद
यावेळी आझाद म्हणाले, येथे 2 विचारांचा संघर्ष आहे. संघाचे लोक मनुस्मृती मानतात आणि आम्ही संविधान मानतो. संघ प्रमुखांनी इंग्रजांची माफी मागितली ते महापुरुष नाहीत. तसेच बऱ्याच राज्यात आमचे सरकार येईल, असा विश्वासही आझाद यांनी व्यक्त केला.