नागपूर : खंडग्रास सूर्यग्रहणानंतर ( Continental Solar Eclipse ) पुन्हा एक खगोलीय घटना अनुभवायला मिळणार आहे. मंगळवारी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण (Chandragrasa lunar eclipse ) पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ % आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चन्द्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वाजता चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वाजता ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल. अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.
खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी असा असेल :८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खग्रास सूर्यग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया,उत्तर-दक्षिण अमेरिका,येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारतीय वेळेनुसार ८ तारखेला दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटांनी छायाकल्प चन्द्रग्रहनाला सुरवात होईल. त्यानंतर ०२ वाजून ३९ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल, ०३.४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होईल तर ०५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ०६.१९ वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वा छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ ०२.१४ तास खंडग्रास काळ ०२.१५ तास खग्रास काळ ०१.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ०५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल.आणि ०७.२६ वा.ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण ग्रस्तोदित भाग लहान होत जाईल.
ग्रहण म्हणजे काय : सूर्य आणि चंद्र यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास ( penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते.