महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maha Weather Update : विदर्भात विजांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्यानं (IMD) ने विदर्भाच्या काही जिल्ह्यात यलो अलर्ट ( Yellow alert in many district ) जारी केला आहे. तसेच विदर्भातील काही क्षेत्रात पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुसळधार पावसाचा सरी कोसळणार असल्याची शक्यता ( Maha Weather Update ) वर्तवली आहे.

Maha Weather Update
राज्यात पावसाची शक्यता

By

Published : Jan 12, 2022, 5:51 PM IST

नागपूर - भारतीय हवामान खात्यानं (IMD) ने विदर्भाच्या काही जिल्ह्यात येलो अलर्ट ( Yellow alert in many district ) जारी करण्यासह राज्यात विदर्भ क्षेत्रात पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुळसळधार पावसाचा सरी कोसळणार असल्याची शक्यता ( Maha Weather Update ) वर्तवली आहे.

'या' जिल्ह्यात यलो अलर्ट -

आयएमडीच्या नागपूर येथील हवामान खात्यानं गुरुवार पर्यंत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आयएमडी ने इशारा दिला आहे की नागपूर, वर्धा भंडारा येथील काही भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस सुरु राहील. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु राहील. सध्या हरियाणा आणि उत्तर मध्यप्रदेशातील चक्रीवादळ वाऱ्यामुळे विदर्भात पाऊस कोसळत आहे.

के. एस. होसालीकर यांची माहिती -

विदर्भात १२- १४ जानेवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता, गडगडाटासह. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता ह्या २ दिवसात. अश्या आशयाचे ट्वीटकरून भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे SID प्रमुख के. एस. होसालीकर यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा - Weather update : नागपूरसह विदर्भात दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details