महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar Vidarbha Visit : अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत मोजावी लागेल - शरद पवार - sharad pawar on anil deshmukh in nagpur

100 कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (anil deshmukh ed custody) अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. (sharad pawar on vidharbh visit) आज ते नागपूर येथे बोलत होते. (sharad pawar in nagpur)

sharad pawar
शरद पवार

By

Published : Nov 17, 2021, 8:46 PM IST

Updated : Nov 17, 2021, 10:59 PM IST

नागपूर -100 कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (anil deshmukh ed custody) अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. (sharad pawar on vidharbh visit) आज ते नागपूर येथे बोलत होते. (sharad pawar in nagpur) आज पहिल्यांदा असे झाले ती मी आलो आणि अनिल देशमुख इथे नाही आहेत, अशी आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. आपण अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहोत. अत्यंत समर्थपणे कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

...म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला -

आताचे केंद्र सरकार एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही की केंद्रीय संस्थांचा वापर करुन त्या राज्यात सत्ता अस्थिर करण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून अडकवण्याचे काम केले आहे. काही लोकांना सत्ता गेली तर त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कसे घालवता येईल, त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनिल देशमुखांवर आरोप लागल्यावर त्यांनी सांगितले की, आरोपांची चौकशी होइपर्यंत सत्तेत बसणार नाही, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला. (Why anil deshmkh resigned)

हेही वाचा -Parambir Singh : परमबीर सिंगांना फरार घोषित करण्यास न्यायालयाची मंजुरी!

केंद्राकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू -

एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेता होते. त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर त्यांचीही चौकशी सुरू झाली. त्यांच्यावर खटले भरवून त्यांचीही अवस्था कशी करून ठेवली आहे. याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात काही करता येत नाही म्हणून त्यांच्या पत्नीच्या मागे चौकशी लावली. बदनामी झाली पाहिजे, म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरी चौकशी करत आहेत. काही निघत नाही, असे अनेक उदाहरण आहेत. राज्यात सरकार परत मिळवता येत नाही म्हणून त्रास देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार मिळाले आहे. त्यात राष्ट्रवादीचे स्थान महत्त्वाचे आहे. काहीही झोले तरी राज्य प्रगतीच्या दिशेने न्यायचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. कितीही काही करा सामान्य जनता तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. अनिल देशमुख यांच्या कोठडीची किंमत मोजावी लागेल. संधी मिळेल तेव्हा अक्कल शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.

अनिल देशमुख प्रकरण नेमकं काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे असा आरोप त्यांनी केलेला आहे.

Last Updated : Nov 17, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details