नागपूर- यापूर्वी अनेक पाळीव प्राण्याचे वाढदिवस थाटात साजरे होताना पाहिले असतील पण कोंबड्याचा वाढदिवस नक्कीच पहिला नसेल. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील कागदेलवार यांच्या नजरेस पडलेलं छोटसं पिल्लू रुबाबदार कोंबड्याच्या एक वर्षाचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या वाढदिवसाची जोरदार चर्चा रंगली आहे. कोंबड्याचा वाढदिवस साधा वाटत असले पण तो थाटात आणि विशेष सजावटीत पार पडला. कोणाचे कोणत्या प्राण्यावर प्रेमात पडेल आणि घराच्या सदस्यासाठी चाहता होईल याचा नेम नाही. गाय, बैल, कुत्रा यांचे वाढदिवस, डोहाळ जेवण साजरे होतांना पाहिले आहे. पण नॉनव्हेज प्रेमींचा आवडता कोंबडा उमरेडच्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या उमाकांत कागदेलवार यांच्या घरच्यांचा सदस्य बनला आहे. यावर विश्वास बसणार नाही. पण उमाकांत यांचा मुलगाच तर मुलगी सुरभी कागदेलवारचा तो जिवा भावाचा भाऊ आहे.
कुचाचा कुचाशेठ कसा झाला...
वर्षभरापूर्वी कोंबड्याचे पिल्लू उमाकांत यांना सापडले. आज ते पिल्लू रुबाबदार कोंबड्याच्या रुपात पाहायला मिळतात. पण वर्षभरात तो जीवाभावाचा झाला. रोज सकाळी तो चहा मुरमुरे आवडीने खातो. लहान असताना कुच कूच आवाज करत असल्याने त्याचे नाव कुचा ठेवण्यात आले. बघता बघता वर्ष लोटत असतांना त्याचा थाट पाहता कुचा आता 'कुचाशेठ' झाले आहे. 'कुचाशेठ' म्हटले तर रुबाब तसाच आहे. खायला काजू, शेंगदाणे, श्रीखंड, काजू कतली हे आवडीचे पदार्थ आहे. त्याला इतर पदार्थही खायला देतात. पण त्या तुलनेत गोड अधिकच आवडीचे खात असल्याचे सुरभी कागदेलवार सांगतात.
श्रीखंड भरवत केले गोड तोंड...