नागपूर - प्रखर उन्हात बैलांकडून काम करवून घेतल्याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'पीपल्स फॉर ऍनिमल' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात बैल-गाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर 'अॅनिमल अॅक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर उन्हात बैलांकडून काम करवून घेतले; दोघांवर गुन्हा दाखल - sun
भीषण उन्हात नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बैल गाडी मालककावरोधात तक्रार दाखल केली होती.
गेल्या ८ दिवसांपासून नागपूर शहरात सूर्य आग ओकत आहे. अशा भीषण उन्हात नागपुरातील दोन व्यापारी बैलांकडून काम करवून घेत असल्याची माहिती पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार या संस्थेच्या लोकांनी थेट जाऊन तक्रारीची शहा-निशा केली. तेव्हा एका बैल गाडीला दोन बैल ओढत असून त्यावर दीड हजार किलो वजनाचे लाकूड ठेवलेले असल्याचे दिसून आले.
त्यानंतर पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट लकडगंज पोलीस ठाणे गाठून बैल-गाडी मालकाविरुद्ध आणि माल वाहून नेणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी सुद्धा तक्रारीची गांभीर्याने दाखल घेत अॅनिमल अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.