नागपूर -नियमभंग करणाऱ्या १० मद्य विक्रेत्यांवर नागपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात मार्गदर्शक तत्त्वानुसार मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही दुकानदारांनी अटी व शर्थींचा अवलंब न करता अटींचा भंग केला.
नियमभंग केल्यामुळे १० मद्य विक्रेत्यांवर गुन्हे दाखल - illegal liquor sell in nagpur
विविध भागातील १० दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नियमांचे भंग करणाऱ्या मद्य विक्रेत्यांमध्ये चांगलीच चांगलीच खळबळ उडाली आहे.
दारू विक्रेते रस्त्यावर मद्य विक्री करीत असल्याच्याही तक्रारी उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर विविध भागातील १० दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नियमांचे भंग करणाऱ्या मद्य विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दाखल गुन्हे व कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून संबंधित मद्य विक्रेत्यांकडून यावर माहिती मागवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अचानक कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने इतर दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.