नागपूर : मेट्रोच्या डब्यांवर स्प्रे पेंटिंग ( Spray painting on Nagpur Metro ) करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेट्रो ट्रेनवर एका अज्ञात व्यक्तीने स्प्रे पेंटिंग करून डेपोमध्ये प्रवेश केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे मेट्रोची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ ( security system of Nagpur Metro is lax ) असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने सोनेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मेट्रोच्या डब्यांवर स्प्रे पेंटिंग :नागपूर शहरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचे महत्त्व वाढले आहे. हजारो नागपूरकर रोज मेट्रोच्या चकचकीत आणि आरामदायक डब्यातून प्रवास करतात. मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असते. मात्र, मेट्रोच्या डेपोत घुसून एका अज्ञात आरोपीने मेट्रोच्या डब्यावर पेंटिंग ( Spray painting on metro coaches ) केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आरोपीचा उद्देश काय :ऑरेंज लाईनवरील खापरी मेट्रो स्टेशनच्या पुढे काही अंतरावर मेट्रो ट्रेनचा डेपो आहे. इथे रोज अनेक मेट्रो ट्रेन पार्क केलेल्या असतात. यापैकी एका मेट्रोच्या इंजिनवर अज्ञाताकडून पेंटिंग केल्याचे दिसून येत आहे. मेट्रोच्या इंजिनवर DROPE KENN असा मजकूर स्प्रे पेंटिंगने लिहिण्यात आला आहे. मात्र असे करण्यामागे अज्ञात इसमाचा उद्देश काय होता? यासंदर्भात खुलासा होऊ शकलेला नाही.