नागपूर :एनव्हीसीसी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष अश्विन मेहाड़िया यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर चौकशी अंती सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक गुन्हेगारी, फसवणूक, बनावटी कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात अशा विविध कलमांखाली अश्विन मेहाडिया यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सर्वसाधारण सभेतही गदारोळ :नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ही मध्य भारतातील एक महत्त्वाची व्यापारी संघटना मानली जाते. गेल्या काही महिन्यांपासून एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या कार्यपद्धतीवर काही माजी अध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला.
आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल :नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. डिसेंबरमध्ये चेंबरच्या सर्वसाधारण सभेत माजी सदस्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर जानेवारीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने NVCC वर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून माजी अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्याविरुद्ध नागपुरातील सीताबर्डी पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.