नागपूर - स्ट्राँग रूम आणि ईव्हीएम वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ नाना पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन दाखवला होता. याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली.
नागपूर : ईव्हीएम वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल - case
पंचायत भवन आणि बचत भवनमध्ये कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची तक्रार निराधार असून स्ट्राँग रूममधील कॅमेरे हे २४ तास सुरू होते, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
कळमनामधून ट्रकमधून सुरक्षितपणे मतपेट्या निर्धारित जागेवर पोहोचवण्यात आल्या. याप्रसंगी २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. कोणतेही कॅमेरे बंद नव्हते. जो व्हिडिओ दाखवण्यात आला आहे त्यात कदाचित डिस्प्लेची समस्या असावी. रूम बाहेर पोलिसांचा पहारा असतो त्यांना दिसण्यासाठी डिस्प्ले सुरू असतात. डिस्प्लेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. पंचायत भवन आणि बचत भवनमध्ये कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची तक्रार निराधार असून स्ट्राँग रूममधील कॅमेरे हे २४ तास सुरू होते, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी जो प्रोटोकॉल जाहीर केला आहे, त्याची परिपूर्ण पालन आम्ही केले आहे. रूम बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्ट्राँगरूमला दुसरा कुठलाही दरवाजा नाही. स्ट्राँगरूम हे अतिशय सुरक्षितरित्या बंद ठेवला जातो अशी माहिती मुद्गल दिली. स्ट्राँगरूमचा व्हिडीओ काढणाऱ्या आणि तो व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात आयपीसी च्या ४२३ आणि ४४७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.