नागपूर :आमदार नितीन देशमुख ( Thackeray Group MLA Nitin Deshmukh ) काही सहकाऱ्यांसोबत रवी भवन येथे गेले ( Case Filed Against Thackeray Group ) होते. यावेळी ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक येणाऱ्या प्रत्येकाची पास चेक करीत होते. सुरक्षारक्षकाने आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पासेस तपासणीसाठी थांबविले. त्यामुळे आमदार नितीन देशमुख ( Thackeray Group MLA Nitin Deshmukh ) भलतेच नाराज झाले होते. त्यांनी आमदारकीचा आपला बिल्ला दाखवून पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद ( Complaint Against Nitin Deshmukh ) घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नितीन देशमुखांवर अटकेची तलवारपोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिवसेनेकडून अटक टाळण्यासाठी धावपळ उडाली. शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी देशमुखांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला मुद्दानागपूर येथे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी ३५३ ‘अ’ गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचा मुद्दा अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला. देशमुख हे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्या समवेत गैरवर्तन केले. आमदार देशमुखांना भेटू दिले नाही.
अंबादास दानवे यांना भेटू दिले नाहीआमदार असल्याचा बॅच मागितला. तसेच विशिष्ट ‘पास’ मागण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. कोणत्याही आमदाराला अशा प्रकारे रोखल्यास त्याचा पारा चढतो. पोलिसांकडून आजवर सातत्याने विशिष्ट पक्षाच्या आमदारांनाच त्रास देण्याचे काम चालू आहे. तरी ३५३ ‘अ’ कलमाचा दुरुपयोग चालू आहे, असा आरोप परब यांनी विधान परिषदेत केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून अटक होणार नाही, अशी ग्वाही द्यावी विनंती केली.