नागपूर - नागपूर येथे शिकणाऱ्या मुलीची भेट घेऊन रात्री गावाकडे परतताना उभ्या ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्या महिला डॉक्टर होत्या. हा अपघात उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रविवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.
Car Accident Nagpur : उभ्या ट्रकला कारची धडक; महिला डॉक्टरचा मृत्यू, तर पुतण्या गंभीर - भिवापूर अपघात
उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कार चालवित असलेला पुतण्या सुमितला दिसला नाही. त्यामुळे कार ट्रकवर जाऊन धडकली. एवढ्यात पाठीमागून आलेली दोन वाहनेही या कारवर येऊन धडकली.
ट्रक दिसला नाही - अस्मिता अशोक नंदेश्वर (वय ५७) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. तर सुमीत दौलत नंदेश्वर (३२, दोघे रा. बारव्हा) असे जखमी पुतण्याचे नाव आहे. रविवारी सुटी असल्याने डॉ. अस्मिता नंदेश्वर या नागपूर येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रात्री बोलेरो कारने (एमएच ३६-एच ८२९८) परत येत होत्या. उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कार चालवित असलेला पुतण्या सुमितला दिसला नाही. त्यामुळे कार ट्रकवर जाऊन धडकली. एवढ्यात पाठीमागून आलेली दोन वाहनेही या कारवर येऊन धडकली. या भीषण अपघातात डॉ. अस्मिता यांचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या सुमित याला उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती बारव्हा येथे होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने लाखांदूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.