नागपूर - रेल्वे सुरक्षा पथकाच्या एस्कॉर्ट टीमने पुन्हा एकदा गांजा तस्करीविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधून (एपी एक्सप्रेस) प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांना आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आरपीएफने तब्बल 11 पॅकेट्समध्ये असलेला 90 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाचा बाजारभाव 9 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजेंद्र संतोष मंडल मुरली, संजीव कुमार सिंह, हरपाल सिंग, कांचन कुमार राम, करीम मोहम्मद कुरेशी आणि सद्दाम अलाउद्दीन हुसेन यांचा समावेश आहे.
एसी बोगीतून गांजाची तस्करी; 90 किलो गांजासह सहा आरोपींना अटक - nagpur Cannabis smuggling news
रेल्वे सुरक्षा पथकाच्या एस्कॉर्ट टीमने पुन्हा एकदा गांजा तस्करीविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधून (एपी एक्सप्रेस) प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांना आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आरपीएफने तब्बल 11 पॅकेट्समध्ये असलेला 90 किलो गांजा जप्त केला आहे.
नागपूर रेल्वे सुरक्षा पथक कारवाई
एसी बोगीतून गांजा तस्करी
विशेष म्हणजे यापूर्वी रेल्वेतून होणारी गांजा तस्करी स्लीपर कोचमधून केली जायची. मात्र आरपीएफकडून स्लीपरकोच बोगीची कसून तपासणी केली जाते. त्यामुळे आरोपींनी कुणालाही संशय येऊ नये म्हणून आता एसी बोगीतून गांजाची तस्करी सुरू केल्याची माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. ज्यानंतर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -देशातील सात राज्यात 'बर्ड फ्लू'चा प्रसार, इतर राज्ये सतर्क