देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया नागपूर : वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचे निलंबन राज्य सरकारकडून मागे घेण्यात आले आहे. निलंबन मागे घेण्याचा आदेश हा कॅगचा कडून देण्यात आला आहे, त्यांचे निलंबन कॅट ने रद्द केले आहे, केवळ राज्य सरकारने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे असे मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्ह्याची खरीप हंगाम आढाव बैठक : आज नागपूर जिल्ह्याची खरीप हंगाम आढाव बैठक झाली. खरिपाच्या नियोजन संदर्भात बैठकीच्या नंतर ते बोलत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या हंगामात पाऊस कमी आल्यास पीक पद्धतीत बदल, अन्य उपाययोजनांच्या पर्यायासाठी प्रशासनाने तयार असावे. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे आयोजित नागपूर जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
80 टक्के बियाण्यांची उपलब्धता :जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावर्षीच्या कृषी विभागाच्या नियोजनांचे सादरीकरण केले. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत मांडलेल्या विविध सूचनांचे स्वागत केले. ते म्हणाले, यावर्षी बियाण्यांची उपलब्धता आहे. याशिवाय उच्चप्रतीचे घरगुती बियाणे निर्मितीची तयारी आहे. खतांची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे. मागील वर्षीचा साठा 80 टक्के उपलब्ध आहे. त्यामुळे खतांची अडचण नाही. तथापि, बियाणे, खते, किटकनाशके यांचा तुटवडा भासणार नाही अशी तरतूद करुन ठेवा.
आकस्मिक कृती आराखडा तयार ठेवा :अल निनो’च्या प्रभावाने पावसाला उशीर झाला तर, कदाचित कापसाची पेरणी कमी होईल. अशावेळी आकस्मिक कृती आराखडा तयार ठेवा. सोयाबीन, तुरीचे बियाणे अधिक लागले, तर त्याची उपलब्धता ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
ड्रोनद्वारे फवारणीला प्राधान्य :यांत्रिकीकरणाच्या संदर्भात अधिक भर या मोसमात द्यावा. रुंद वरंभा सरी पेरणीयंत्र (बीबीएफ) द्वारे पेरणी करावी. यामुळे जमीनीत पाण्याचा ओलावा अधिक राहतो. जिल्ह्यात अधिकाधीक पेरणी यंत्रामार्फत व्हावी, यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी सूचना त्यांनी केली. नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून यावर्षी ड्रोनद्वारे फवारणी करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागाला तशी सूचना केली आहे. बचत गटांना यामध्ये सहभागी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
- CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हावर अजूनही वाद
- Bawankule on Thackeray : उद्धव ठाकरे हे तर 'रडोबा'; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका