नागपूर -हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांच्या आतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ सहा मंत्री काम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचेही ते म्हणाले.
'हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार' - ajit pawar on Cabinet expansion
अजित पवार पुढे म्हणाले, "अधिवेशन संपल्यानंतर माहाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मंत्रीपदासाठीचे अंतिम उमेदवार जाहीर होतील. हिवाळी अधिवेशन शनिवारी संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
हेही वाचा -अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास माझा विरोध नाही - छगन भुजबळ
अजित पवार पुढे म्हणाले, "अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मंत्रीपदासाठीचे अंतिम उमेदवार जाहीर होतील. हिवाळी अधिवेशन शनिवारी संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे"