नागपूर - विधानभवन परिसरातील कार्यालयात मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर २ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानभवन परिसरात काँग्रेसची बैठक, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता - हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशनासाठी महाविकास आघाडीच्या ६ मंत्र्यांना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही बाकी आहे. तसेच येत्या २२ ते २३ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. आज काँग्रेसच्या बैठकीमध्ये कोणाला कोणती खाती द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी महाविकास आघाडीच्या ६ मंत्र्यांना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही बाकी आहे. तसेच येत्या २२ ते २३ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. आज काँग्रेसच्या बैठकीमध्ये कोणाला कोणती खाती द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची बैठक होऊ शकते. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व आमदार उपस्थित आहेत.
दरम्यान, नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र यावे का? यासंदर्भात आज तिन्ही पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.