नागपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. शहरातही या कायद्याला विरोध करत आंदोलन करण्यात आले. या कायद्याला आमचा विरोध कायम आहे. म्हणून हा कायदा राज्यात लागू करणार नाही, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी आंदोलनात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री राऊत हे सहभागी झाले होते.
राज्यात 'हा' कायदा लागू करणार नाही - डॉ. नितीन राऊत - caa protest nagpur latest news
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. यानंतर याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याला देशातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे.
मंत्री डॉ. नितीन राऊत
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. यानंतर याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याला देशातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. शहरातही या कायद्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -'उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी फडणवीसांना "लाथ" मारली'