महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Businessman House Theft : सौदी अरेबियाला जाण्यासाठी स्वत:च्याच घरी ७० लाखांची चोरी; व्यावसायिकाच्या मुलाचा कारनामा - Businessman House Theft

एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी झालेल्या 73 लाखांच्या (BUSINESSMAN SON STOLE 73 LAKH AT HOME) घरफोडीचा (Businessman house theft Nagpur) पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे. व्यावसायिकाच्या मुलानेच घरात चोरी (Businessman son theft at home) केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीसह दोघांना अटक (Businessman Son arrested in Theft Case) केली आहे. जाफर जावेद थारा असे आरोपीचे नाव आहे. जाफरने सौदी अरेबियाला जाण्याची घरी चोरी केली (Stealing to go to Saudi Arabia) होती. (Businessman House Theft), Nagpur Crime, latest news from Nagpur

Businessman House Theft
व्यावसायिक घर चोरी नागपूर

By

Published : Nov 2, 2022, 1:33 PM IST

Updated : Nov 2, 2022, 2:38 PM IST

नागपूर: नागपूर शहरातील शांतीनगर परिसरातील एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी झालेल्या 73 लाखांच्या (BUSINESSMAN SON STOLE 73 LAKH AT HOME) घरफोडीचा (Businessman house theft Nagpur) पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे. व्यावसायिकाच्या मुलानेच घरात चोरी (Businessman son theft at home) केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीसह दोघांना अटक (Businessman Son arrested in Theft Case) केली आहे. जाफर जावेद थारा असे आरोपीचे नाव आहे.

जाफरने सौदी अरेबियाला जाण्याची घरी चोरी केली (Stealing to go to Saudi Arabia) होती. पोलिसांनी आरोपी जाफर जावेद थारा कडून (Businessman House Theft) घरातून चोरलेले दीड किलो सोनं आणि 13 लाख रुपयांची रोखड असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त (Stolen property recovered) केला आहे.

चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नागपूर

पोलिसी हिसका दाखवताच मुलाने दिली चोरीची कबूली-दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील शांतीनगर भागात राहणारे व्यावसायिक जावेद थारा हे संपूर्ण कुटुंबासह कामठी येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. घरी परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच शांतीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, घरातील व्यक्तीच चोरीच्या घटनेत सहभागी असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता जावेद थारा यांचा मुलगा जाफर याच्यावर पोलिसांना संशय वाढत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता आरोपींने मित्राच्या मदतीने घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.

चोरीचा मुद्देमाल जप्त


आरोपीला हुशारी नडली: जावेद थारा यांच्या घरी 73 लाखांची चोरी झाली तेव्हा त्यांचे सर्व कुटुंबीय कामठी येथील एका कार्यक्रमात सहभागी होती. आरोपीने कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीचं घरात चोरी केली. त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून तो देखील कार्यक्रमात उपस्थित झाला. त्यामुळे प्रथमदर्शनी त्याच्यावर घरच्यांना संशय गेला नाही.


सौदीला जाण्यासाठी घरात केली चोरी: आरोपी जाफरला सौदी अरेबियाला जायचे होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सौदीला जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे त्याने घरातील 13 लाख आणि दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते.

Last Updated : Nov 2, 2022, 2:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details