महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime News: मेयो रुग्णालयात धक्कादायक प्रकार! बुरखाधारी महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला अटक - Burka Wearing Man

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) एक भलताच प्रकार समोर आला आहे. मेयो रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी परिसरातून बुरखाधारी महिलेंच्या वेशात फिरणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. जावेद शेख शफी शेख असे महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Nagpur Crime News
महिलेंच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला अटक

By

Published : Jun 15, 2023, 12:00 PM IST

Updated : Jun 15, 2023, 1:15 PM IST

नागपूर :नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसांपासून मेयो रुग्णालय परिसरात एक बुरखाधारी महिला ही डॉक्टर वार्ड तसेच रुग्णालय परिसरात फिरताना दिसून येत होती. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला कर्मचाऱ्याला तिच्यावर संशय आल्याने तिला थांबवत तिची विचारपूस केल्यावर भलताच प्रकार समोर आला. बुरख्यात असणारी महिला नसून चक्क पुरुष असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले, तेव्हा ते देखील हबकले. ज्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली.


जावेद शेख हा समलैंगिक :तहसील पोलिसांनी चौकशी जावेद शेख शफी शेखची कसून चौकशी केली. त्यानंतर बुरखाधारी पुरुष हा नागपुर येथील ताजबाग मागे राहत असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या जवळून तीन मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेला जावेद शेख हा समलैंगिक असून महिलेच्या वेशात पुरुषांचे मोबाईल क्रमांक गोळा करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस अजून पुढील तपास करीत आहे.

लेकीने घडवला बापाचा खून :मे महिन्यात दिलीप सोनटक्के यांची हत्या झाली होती. ते नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पेट्रोल पंप मालक होते. या खून प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना सुरुवातीला अटक केली होती. परंतु पोलिसांना काही दिवसांनी मात्र हत्येची दुपारी देणारा मास्टर माईंड हाती लागला होता. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हत्येमागे असलेल्या सूत्रधाराचा बुरखा चेहरा समोर आणला. त्यामुळे अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली होती. पेट्रोल पंप मालक दिलीप सोनटक्केची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी घडवून आणली नव्हती. दिलीप सोनटक्के यांच्या मुलीनेच वडिलांची हत्या सुपारी देऊन केली, असे तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा :

  1. Annual festival : केरळमध्ये चामयाविलक्कू उत्सवाला सुरुवात! पुरुष एक दिवसासाठी महिलांच्या वेशात
  2. Man Wearing Women Clothes : पती घालतो महिलांचे कपडे, लावतो लिपस्टिक...पत्नीची थेट पोलिस ठाण्यात धाव!
  3. 2 मिनिटांत 2 लाखांचे दागिने लांबविणाऱ्या बुरखाधारी महिला सीसीटीव्हीत कैद
Last Updated : Jun 15, 2023, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details