नागपूर: बुलढाणा जिल्ह्यतील मनीषा (बदलले नाव) नामक तरुणीसोबत जीवनचे विवाह बाह्य संबंध होते. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नव्हता. दोघांत बरेच दिवस प्रेमसंबध होते. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. पण पत्नीसोबत घटस्फोट घेऊन मनीषासोबत लग्न करण्यास त्याने असमर्थ दाखवली. मनीषाने सुद्धा जीवनशी लग्न करण्यासाठी समजूत घातली. पण मनीषाला यश आले नाही. त्यामुळे तिने जीवनसोबत असलेले नातेसंबंध तोडून (Breaking up does not mea) विवाह करण्याचा पर्याय निवडला.
तिने दुसारा विवाह केल्यानंतर अगोदरच पत्नीपासून दूर झाल्याने नैराश्यात गेलेल्या जीवनने आत्महत्या केली. यात जीवनच्या आईने 7 मे 2021 रोजी पोलिसात तक्रार दिल्याने मनिषावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मनीषाने आपल्यावर अन्याय झाला असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मान्य केली. यात आईने केलेला आरोपावर न्यायालयाने सुनावणी घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले.