अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन कोटी रुपयांची पुस्तक विक्री नागपूर:९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक दृष्टीने विशेष ठरले आहे. कधी नव्हे तर यावर्षी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. तर शतक महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ मराठी साहित्य संघाला दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य संमेलनात पुस्तक विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
दोन कोटी 89 लाख रुपयांची पुस्तक विक्री: ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदालन वैशिष्ट्यपूर्ण होते. या ग्रंथादालनाचे मुख्यद्वार हे पुस्तकाच्या मुखपृष्ठ सारखे बनविण्यात आले होते. या दालनात पुस्तकांसाठी 276 स्टॉल लावण्यात आले होते. तर इतर 19 स्टॉलवर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. चार दिवसांच्या प्रदर्शनात दोन कोटी 89 लक्ष रुपयांच्या पुस्तकाची विक्री झाली. अशी माहिती विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि महेश मोकलकर यांनी दिली. ग्रंथादालनाची जबाबदारी ही नरेश सब्जीवले यांना देण्यात आली होती.
55 लाखांची पुस्तक विक्री:वर्धात 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात 32 स्टॉल लावण्यात आले होते. येथे 10 हजारांच्या वर संविधानाच्या प्रति विकल्या गेल्या. महात्मा फुले, अ.ह.साळुंखे, यशवंत मनोहर, शरद पाटील यांच्या पुस्तकांना मागणी होती. गांधी का मरत नाही, हू किल लोहिया ही पुस्तके सर्वाधिक विकली गेली आहे, असे कार्याध्यक्ष किशोर ढबाले यांनी सांगितले. तर एकूण 55 लाख रुपयाचे पुस्तके विकल्या गेली आहे.
साहित्यप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र:साहित्य नगरीत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी 300 दालनांची उभारणी करण्यात आली होती. त्यात राज्य व राज्यबाहेरील नामवंत प्रकाशक व पुस्तक विकेत्यांच्या दालनांचा समावेश होता. याशिवाय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयासह विविध विभागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाची चार स्वतंत्र दालने आहेत. त्यात आयोगाची पुस्तके, मतदार नोंदणी दालनाचा समावेश होता. वर्धा साहित्य संमेलनात तयार करण्यात आलेला प्रकाशन कट्टा नाविन्यपुर्ण उपक्रम होत. हा कट्टा वाचन चळवळीला चालना देणारा ठरला, असे प्रकाशन मंचच्या उद्घाटन प्रसंगी भारत सासणे यांनी सांगितले.
हेही वाचा: Marathi Sahitya Sammelan 2023 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा इतिहास उलगडणारे दालन