नागपूर :दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. नुकतेच समोर आले आहे की, एम्समध्ये औषधांचा काळाबाजारहोत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये औषधांच्या नावावर रुग्णांची लूट सुरू आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णाचा एमआरआय काढण्यापूर्वी ‘कॉन्ट्रास्ट’ नामक इंजेक्शन रुग्णाला आणण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्या इंजेक्शनचा उपयोगचं केला जात नव्हता, उलट इंजेक्शन संबंधित मेडिकल दुकानात परत केले जात होते. त्यानंतर मोठी रक्कम हडप केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक कर्मचारी व एका दलालांचा सामावेश आहे.
पैसे कमावण्याच्या नवीन युक्त्या : दिवसें-दिवस एम्समध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही कर्मचाऱ्यांनी यातून पैसे कमावण्याच्या नवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. क्ष-किरणशास्त्र विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी गरीब रुग्णांची आर्थिक लूट सुरू केल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार एम्स प्रशासनाच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एम्सचा एक कर्मचारी व एक दलाल अशा दोघांना अटक केली.
'कॉन्ट्रास्ट' इंजेक्शन कश्यासाठी वापरतात :ज्यावेळी रुग्णाचा 'एमआयआर' काढायचा असतो त्यावेळी त्या रुग्णाला 'कॉन्ट्रास्ट' नामक इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन टोचल्यावर एमआरआयची फ्लिम अगदी स्पष्ट दिसते व त्यामुळे रुग्णाला झालेल्या आजाराचे अचूक निदान होते. या प्रकरणी आणखी पोलीस तपास सुरू आहे, जी काही आवश्यक कारवाई असेल ती नक्की केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे. क्ष-किरणशास्त्र (एक्सरे) विभागात कार्यरत काही कर्मचारी हा काळाबाजार करत असल्याचे पुढे आले आहे.