महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात २ टन काळा गूळ जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्याचे काम त्या चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्याअनुषंगाने रात्री पिकप गाडी मध्यप्रदेश येथून नागपूरला येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या गाडीची तपासणी केली. त्यामध्ये २ टन काळा गुळ आढळून आला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथाकाने ताब्यात घेतलेले आरोपी

By

Published : Mar 27, 2019, 1:22 PM IST

नागपूर -जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील सिरोंची चेक पोस्ट २ टन काळा गूळासह वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. मनोज शेंडे असे आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विविध जिल्ह्यात दारूची मागणी प्रचंड वाढलेली आहे. त्याचबरोबर हातभट्टीच्या दारूची विक्रीसुद्धा वाढलेली आहे. वाढती मागणी लक्षात घेता अवैध दारूची निर्मिती आणि तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दारूची निर्मिती आणि तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागही सज्ज झाले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. यासोबतच मध्य प्रदेशातून काळा गुळ नागपूरच्या भिवसेन खोरी या ठिकाणी आणला जातो. त्या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुषंगाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्याचे काम त्या चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्याअनुषंगाने रात्री पिकप गाडी मध्यप्रदेश येथून नागपूरला येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या गाडीची तपासणी केली. त्यामध्ये २ टन काळा गुळ आढळून आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details