नागपूर- औरंगाबाद येथे काही दिवासांपूर्वी एका युवतीवर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाने शिकवणी सुरू करण्यासाठी मदत करतो, असे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यभरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी (दि. 30 डिसें.) नागपुरातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना आधीच अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी भाजपच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमधे शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आंदोलकांकडून महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पाहता गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली.
काय आहे प्रकरण