नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत आज भाजपतर्फे राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत असतानाच सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या विरोधातही आज भाजप शिक्षक आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
शिक्षण विभागात निर्णय क्षमता नसल्याचा आरोप करत भाजपच्या शिक्षक आघाडीकडून निषेध
शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अडचणीत आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने केला आहे. ज्याविरुद्ध भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आज शिक्षण बचाव आंदोलन करण्यात आले.
शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अडचणीत आल्याच्या आरोप भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने केला आहे. ज्याविरुद्ध भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आज शिक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत लोकडाऊनचे सर्व नियम पाळून शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
दहावीच्या भूगोल विषयाचा गुणांचा तिढा अजूनही कायम आहे. १० आणि १२ च्या निकालांच्या तारखा अजूनही घोषित झाल्या नाहीत. सोबतच पुढील शैक्षणिक वर्षांचे शाळांचे नियोजन अद्याप केले नसल्याने शाळा कधी सुरू होतील, कशा सुरू होतील, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी घेता येईल. याबाबत शाळा आणि पालकांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. शिवाय प्रवेश प्रक्रिया, अतिरिक्त शिक्षकांचा विषय यासारखे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ज्याविरुद्ध हे निषेध आंदोलन करण्यात आले.