महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जाळला गृहमंत्री देशमुखांचा प्रतिकात्मक पुतळा

नागपुरात देशमुख यांच्या घराबाहेर भाजपाच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांची कुमक मागवून या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनामाच्या मागणी
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनामाच्या मागणी

By

Published : Mar 21, 2021, 1:14 PM IST

Updated : Mar 21, 2021, 6:16 PM IST

नागपूर- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीरसिंह यांच्या लेटर बॉम्बने विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. त्याप्रमाणे नागपुरातील संविधान चौक येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देशमुखांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलिसांनी आंदोलकाना अटक केली आहे.

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जाळला गृहमंत्री देशमुखांचा प्रतिकात्मक पुतळा

हेही वाचा-100 कोटींच्या वसुलीप्रकरणात अनिल परब यांचीही चौकशी करा - किरीट सोमैय्या

आंदोलकांना ताब्यात
भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यात आरोप होऊन 24 तास उलटून गेले. मात्र, नैतीकता बाळगून राजीनामा त्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता. तरीही अद्याप त्यांनी राजीनामा दिला नसल्याचा निषेध करत भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात देशमुख यांच्या घराबाहेर भाजपाच्या युवा आघाडीच्या कार्यकर्तांनी देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांची कुमक मागवून या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनामाच्या मागणी

गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेला देण्यात आल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रामध्ये केला आहे. हे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनामाच्या मागणी

हेही वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Last Updated : Mar 21, 2021, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details