महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bawankule Taunt MVA: बावनकुळेंचा मविआला टोला; म्हणाले, ''महाराष्ट्र सांभाळता आला नाही अन्...'' - Bawankule Taunt MVA

विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटलेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लावला आहे.

Bawankule Taunt MVA
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Jun 23, 2023, 10:27 PM IST

बावनकुळेंची मविआविषयी प्रतिक्रिया

नागपूर : पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून त्यांना वाटतं की, आम्ही आज एकत्र आलो नाही तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

एनडीएला ४०० जागा मिळतील :विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीएला ४०० हून अधिक जागांवर विजय मिळणार एवढी ताकद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आजसुद्धा नरेंद्र मोदी अमेरिकेत भारताला मांडत आहेत.


तक्रारीची चौकशी व्हावी:महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की, तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.


राष्ट्रवादी ओबीसी विरोधीच:राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये पुन्हा महानाट्य सुरू झाले आहे. ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहेत. म्हणूनच पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.

हेही वाचा:

  1. Lalu Yadav on Rahul Gandhi : चकाचक दाढी करून बोहल्यावर चढा; लालूंचा राहुल गांधींना भन्नाट सल्ला
  2. Patna Opposition Meeting : 'तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही', विरोधकांच्या बैठकीनंतर कोण काय बोललं? जाणून घ्या
  3. JP Nadda : 'इंदिरा गांधींनी ज्यांना तुरुंगात टाकले तेच आज..' जेपी नड्डांची विरोधकांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details