नागपूर :अजित पवारांच्या बद्दलच्या बातम्या पेरण्याची सुरुवात संजय राऊत यांनीच केली होती, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवार यांना भेटायला गेले, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाला पेव फुटला. अजित पवारांनी मंगळवारी या सर्व खोट्या बातम्यांची सुरुवात कोणी केली, हे सांगितलेले आहे. संजय राऊत शरद पवारांचे ऐकतात, ऐकत नाही याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. अजित पवारांना गेले दोन वर्षांपासून बदनाम करण्याचा काम केले जात आहेत. त्यांच्या प्रतीमेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमधीलच काही लोक जबाबदार आहेत.
तावडे समिती अस्तित्वात नाही :पक्षामध्ये अशी कोणतीही तावडे समिती तयार झाली नाही. असा कोणताही रिपोर्ट तयार झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप मागे पडतो आहे, असा नरेटिव्ह तयार करण्यासाठी कपोलकल्पित बातमी तयार करण्यात आली आहे. खारघरच्या घटनेबद्दल भाजपमधील सर्वच नेते रुग्णालयापासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. रुग्णालयामध्ये सर्व व्यवस्था भाजप नेते गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होत आहे. तानाजी सावंत ही लक्ष ठेऊन आहेत. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विरोधक खोटे आरोप करत आहेत.
विदर्भ पातळीवरची समन्वय बैठक :गुरूवारी संघ आणि भाजपची विदर्भ पातळीवरची समन्वय बैठक आहे. मी या बैठकीत उपस्थित राहणार आहे. ही नियमितपणे होणारी बैठक आहे. त्यात काही विशेष नाही. पक्ष विस्तार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. तीन कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आमचे लक्ष्य आहे. या माध्यमातून घराघरात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. दर मंगळवारी पक्षात प्रवेश होणार आहे. या मंगळवारीही एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे. मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश ही त्या-त्या वेळेत होतील, मात्र सध्या आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर लक्ष घातले आहे.