नागपूर :देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा शपथविधीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कारस्थान असल्याचा आरोप भाजप प्रेदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. २०१९ साली देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
शपथविधीमागे कट : आजवर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले होते. आमचा ही तसा समज होता. आता जयंत पाटील यांच्याकडून वक्तव्यानंतर असा कळतंय की देवेंद्र मुख्यमंत्री न होऊ देण्यामागे शरद पवारांचे षड्यंत्र होते. पवार महाराष्ट्राताले असे नेते आहे की, ते कधीही असे कारस्थान करणार नाही. मात्र, आता जयंत पाटील यांनीच तसा दावा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे म्हणाले आहेत.
शरद पवारांनी केले कारस्थान : महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना मतांचा कौल दिला होता. त्याला छेद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनी षड्यंत्र केले असेच जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्या वरून दिसत आहे असे बवनकुळे म्हणाले आहेत. शरद पवार हेच या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार होते, हेच दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शरद पवारांना शोभले का देवेंद्र फडणवीस यांना जनतेचा कौल मिळाला होता. त्याला कपटकारस्थान करून छेद देणे हे शरद पवार सारख्या राजकरण्याला किती शोभले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
जयंत पाटलांच्या मनात काय : शरद पवार यांनी कुठलेही कपटकारस्थान केले नसेल, तर जयंत पाटील का शरद पवार यांना बदनाम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्यावर काही अन्याय झाला आहे का. भविष्यात याचे खुलासे ही होतील असे बवनकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर दोनच शक्यता आहेत. एक तर शरद पवार खरोखर कट कारस्थानामध्ये होते. त्यांनी शकुनी मामाची भूमिका बजावली नसेल तर, जयंत पाटील खोटे बोलत असतील. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होऊ द्यायचा नव्हते तर, देवेंद्र फडणवीस यांच्या बाबी आम्हाला चालत नाहीत असे जाहीररित्या सांगायला पाहिजे. आतापर्यंत एकटे उद्धव ठाकरे आमच्या दृष्टीने षड्यंत्रकारी शकुनी मामाच्या भूमिकेत होते. मात्र, जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यात शरद पवार यांचाही सहभाग होता हे दिसून येत आहे.