महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधिमंडळात घुमणार 'मी पण सावरकर'चा आवाज; भाजपचा शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न

शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थगिती सरकार आहे, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत विरोधीपक्षाने सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला होता.

winter sension
विधिमंडळात घुमणार 'मी पण सावरकर'चा आवाज

By

Published : Dec 16, 2019, 10:25 AM IST

Updated : Dec 16, 2019, 2:46 PM IST

मुंबई- विधिमंडळाचे आजपासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरू होणारे हिवाळी अधिवेशन शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याचे संकेत आहेत. भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता आहे. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापणार आहे. भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात आले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील सभे दरम्यान, माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यावरून देशभरात भाजपनेते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात हिदुत्ववादी विचारधारेची शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेत आली आहे. त्यामुळे सावरकराच्या या मुद्दयावरून भाजप मी पण सावरकर म्हणत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.

विधिमंडळात घुमणार 'मी पण सावरकर'चा आवाज; भाजपचा शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न
शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थगिती सरकार आहे, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत विरोधीपक्षाने सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला होता.

यावर, आम्ही वचन पाळणारे असून शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सावरकरांबद्दल शिवसेनेला कायम आदरच राहील. जी भूमिका काल होती, तीच आज आणि उद्याही राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते.

शपथविधीला 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही खातेवाटप न झाल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिवेशनानंतर, डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात खातेवाटप जाहीर होण्याची चिन्हं आहेत. मात्र, आता नागपुरातील हिवाळी अधिवेशनात काय होणार, कोणकोणते मुद्दे गाजणार, कसलेले विरोधीपक्ष नेते आणि नवखे मुख्यमंत्री यांच्यामध्ये कसा कलगीतुरा रंगणार, याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

Last Updated : Dec 16, 2019, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details