नागपूर- भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नुकतेच मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात सहभाग नोंदवून नागपूरला परत आले होते. त्यानंतर पुन्हा पक्षाच्या कामात आणि जनसेवेत ते सक्रिय झाले होते. आज त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाल्याने ते गृह विलगीकरणात गेले आहेत.
प्रवीण दटके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती ज्यामध्ये त्यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे गृह विलगीकृत झालो असलो, तरी या दरम्यान संघटन म्हणून सुरू असलेली कोविड प्रभावित नागरिकांची सेवा अबाधित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.