नागपूर- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कधीही या उत्तर भारतीयांच्या अरक्षणाची मागणी न करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी करणे म्हणजे स्टंट आहे, अशा शब्दात टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. मतांच्या राजकारणासाठी केलेली ही मागणी आहे.
मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ
आरक्षण देण्यास काही हरकत नाही, अशी भूमिका ओबीसी नेते मंत्री वडेट्टीवार यांनी मांडली आहे. राज्याला आरक्षण देण्याच्या अधिकार केंद्राने दिले आहे. राज्यांनी त्यावर निर्णय घ्यावा. त्यात नियम काय आहेत ते तपासून घ्यावे. अगोदरच मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. ओबीसी अरक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. धनगर आरक्षणाचा निर्णय घेत नाही. एकीकडे आहे ते आरक्षण धोक्यात असताना. निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय ओबीसींना आरक्षण देण्याची नवीन मागणी करत आहे.
राज्य सरकार विकासाच्या मुद्द्यावर फेल