महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाभकास सरकार शेतकऱ्याच्या कंबरेवर लात मारण्याचे महापाप करतंय - आनंद राऊत

भाजप किसान मोर्चाचे महामंत्री आनंद राऊत यांनी नागपूर येथील टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. (BJP Kisan Morcha mahamantri Anand Raut at Nagpur) महाराष्ट्रातील विद्यमान सरकार महाविकास आघाडी सरकार (MVA Government) नसून महाभकास सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. (Anand Raut criticized mva government nagpur)

BJP Kisan Morcha mahamantri Anand Raut
भाजप किसान मोर्चाचे महामंत्री आनंद राऊत

By

Published : Nov 21, 2021, 9:36 PM IST

नागपूर - महाराष्ट्रातील विद्यमान सरकार महाविकास आघाडी सरकार (MVA Government) नसून महाभकास सरकार आहे. (Anand Raut criticized mva government nagpur) शेतकऱ्याचे अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन कापून शेतकऱ्यांचे कंबरड्यावर लात मारण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे महामंत्री आनंद राऊत यांनी केला. (BJP Kisan Morcha mahamantri Anand Raut) ते नागपूरात टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP Kisan Morcha mahamantri Anand Raut at Nagpur)

भाजप किसान मोर्चाचे महामंत्री आनंद राऊत पत्रकार परिषदेत बोलताना

7 ते 8 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले -

सरकारमधील नेते सत्ता येण्यापूर्वीच हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी करत होते. मात्र, आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतांना केवळ 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. तेच मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतांना एनडीआरएफच्या निकषांच्या तीनपट आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली. या सरकारने मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत जवळपास 7 ते 8 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आल्याची माहिती असून हे पाप महापाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. यानंतर सरसकट वीज बिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्याचे वीज कापणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटात आर्थिक मदत करण्याचे सोडून वीज कापून कमरेवर लात मारण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू केले आहे.

हेही वाचा -गोंदिया : लगे रहो मुन्नाभाई !! महिलेने ब्लूटूथद्वारे सोडवला TET चा पेपर

शेतकऱ्याचे कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडले गेले पाहिजे. भविष्यातही वीज कनेक्शन कापणार नाही, असे आश्वासन द्यावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा जो शब्द महाविकास आघाडी सरकारने दिला तो शब्द पाळला पाहिजे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे. अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात विधान भवनावर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details