नागपूर -जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या तीन युवा कार्यकर्त्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात तीनही कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. याचाच निषेध म्हणून नागपुरात भाजपा युवा मोर्चाकडून जोरदार निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याचे दहनही करण्यात आले. शहरातील बडकस चौकात हे निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आले. सोबतच या प्रकरणी पाकिस्तानला लवकरच चोख देऊ, अशा इशाराही युवा मोर्चाकडून देण्यात आला.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी भाजयुमो आक्रमक - जम्मू-काश्मीर हत्या प्रकरण
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून नागपुरात भाजपा युवा मोर्चाकडून जोरदार निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला.
पाकिस्तानला भारतीय सैन्याशी लढणे शक्य नाही. त्यामुळे देशसेवा करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर असे हल्ले घडविल्या जात असल्याचा आरोपही युवा मोर्चा कार्यकर्त्यां शिवानी दाणी यांनी केला. या निषेध आंदोलना दरम्यान पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करत 'पाकिस्तान मुर्दांबाद'च्या घोषणाही देण्यात आल्या. शिवाय पाकिस्तानला ज्या भाषेत समजते त्या भाषेत आमचे पंतप्रधान लवकरच उत्तर देईल, असेही शिवानी दाणी यांनी सांगितले. या आंदोलनाला शहरातील युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.