नागपूर - महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आता मुंढे यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस देखील मिळाली आहे.
भाजपच्या नगरसेविकांचे तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आंदोलन - तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आंदोलन
हापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आता मुंढे यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत.
स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिवांनी मातृत्व रजेपासून वंचित ठेवत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मुंढे यांच्यावर केला आहे. या घटनेच्या विरोधात भाजपच्या महिला नगरसेविकांनी मुंढे यांच्या कॅबिनसमोर ठिय्या आंदोलन केले. काळं मास्क आणि हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. कालसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आंदोलनाचा निर्धार केला होता. मात्र, सुरक्षेचा तगडा बंदोबस्त महानगरपालिकेत तैनात करण्यात आल्याने त्यांना आंदोलन करता आले नाही. मात्र, आज संधी मिळताच या महिला नागरसेविकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.