महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरचे महापौर संदीप जोशींचा राजीनामा; भाजपाचे नगरसेवक दया शंकर नवे महापौर - Nagpur municipality latest news

नागपूरचे महापौरपद हे तीन नेत्यांमध्ये वाटून देण्यात आले होते. पाहिल्यांदा नंदा जिचकार यांना महापौर पदाचा मान मिळाला. त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर संदीप जोशी महापौरपदी विराजमान झाले. आता त्यांचा देखील कार्यकाळ पूर्ण झाला असून आता नागपूरचे नवे महापौर शंकर तिवारी असणार आहेत.

नागपूरचे महापौर संदीप जोशींचा राजीनामा
नागपूरचे महापौर संदीप जोशींचा राजीनामा

By

Published : Dec 22, 2020, 12:55 PM IST

नागपूर-नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. महापौर पद ठरल्या प्रमाणे तेरा-तेरा महिन्यांसाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांना वाटून देण्यात आले होते, त्यापैकी पहिला कार्यकाळ जोशी यांचा पूर्ण झाल्यानंतर आता नागपूरचे नवे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत.

नागपूरचे महापौर संदीप जोशींचा राजीनामा

लोकहिताची कामे अपूर्णच-

महापौर हे पद ठरल्याप्रमाणे तेरा-तेरा महिन्यांसाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांना वाटून देण्यात आले होते. त्यापैकी पहिला कार्यकाळ संदीप जोशी यांचा पूर्ण झाल्यानंतर आता नागपूरचे नवे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत. या १३ महिन्यांपैकी १० महिने कोरानाकाळात गेले असल्याने बरेचसे लोकहिताचे काम पूर्ण करण्याची फारशी संधीच मिळाली नसल्याचं मत मावळते महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केलं आहे.

तीन जणांमध्ये विभागले पद-

नागपूर महानगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपकडे महापौर पदाकरिता अनेक जेष्ठ नगरसेवक वेटिंगवर असल्याने हे महापौर पद तीन नेत्यांमध्ये वाटून देण्यात आले होते. त्यापैकी पाहिल्यांदा नंदा जिचकार यांना महापौर पदाचा मान मिळाला. त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर संदीप जोशी महापौरपदी विराजमान झाले. आता त्यांचा देखील कार्यकाळ पूर्ण झाला असून पुढील महापौर म्हणून भाजपचे सर्वात जेष्ठ आणि अभ्यासू,अनुभवी नगरसेवक म्हणून ओळख असलेले दया शंकर तिवारी यांच्या कडे महापौर पदाची सूत्रे सोपालवली जाणार आहेत.

मुंढे- जोशी संघर्ष-

संदीप जोशी यांच्या काळात तुकाराम मुंडे नागपूर पालिका आयुक्त म्हणून नागपुरात आले त्या काळात मुंडे विरुद्ध संदीप जोशी असा संघर्ष अनेकदा नागपूरकरांची बघितला. मुंडे यांच्या एकाधिकारशाहीमुळे नागपुरातील विकास कामांना खीळ बसल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. नागपुरात पदवीधर मतदार संघात संदीप जोशी यांचा पराभव झाला होता. तुकाराम मुंडे यांच्यासोबत झालेल्या संघर्षाचा फटका जोशी यांना बसल्याची चर्चा आहे. मात्र, संदीप जोशी यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details