महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP-Congress Karyakarta Rada Nagpur : नागपुरमध्ये भाजप-काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड

महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा ( Bjp Corporator Virendra Kukreja ) यांच्या कार्यालयासमोर आणि कार्यालयात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ( BJP-Congress Karyakarta Rada Nagpur ) आज सकाळी 11वाजताच्या सुमारास झालेला राड्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला.

BJP-Cognress Karyakarta Rada Nagpur
नागपुरमध्ये भाजप-काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

By

Published : Feb 27, 2022, 6:10 PM IST

नागपूर - महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा ( Bjp Corporator Virendra Kukreja ) यांच्या कार्यालयासमोर आणि कार्यालयात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ( BJP-Congress Karyakarta Rada Nagpur ) आज सकाळी 11वाजताच्या सुमारास झालेला राड्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला. तसेच कार्यालयात तोडफोड करत तिथल्या साहित्याची नासधूस केल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा ( Bjp Corporator Virendra Kukreja Allegations ) यांनी केला आहे.

याबाबत बोलताना भाजपचे नगरसेवक

दोन्ही पक्ष तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात -

वीरेंद्र कुकरेजा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आहे. समता नगर आणि सुगत नगर परिसरात त्यांचे लक्ष नाही. काँग्रेस कार्यकर्ता बाबू खानच्या नेतृत्त्वात आज काही लोकांनी कुकरेजा यांचे जनसंपर्क कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचे प्रयत्न केले आहेत. तिथे वाद होऊन त्याची परिणिती कुकरेजा यांच्या कार्यालयातील तोडफोडमध्ये झाली. सध्या दोन्ही पक्ष परिसरातील जरीपटका पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचले आहेत. ( Jaripatka Police Station ) जरीपटका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस ठाण्यासमोर दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा -Marathi Bangla Dictionary Nagpur : साहित्य वाचनाच्या गरजेतून मराठी बांगला शब्दकोशाची निर्मिती; ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

...view details