नागपूर - महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विक्रम ग्वालबंशी यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाने काँग्रेस उमेदवार पंकज शुक्ला यांच्यासह विरोधातील सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
नागपूर महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा दणदणीत विजय हेही वाचा -जिल्हा परिषदेच्या पराभवाची लाखो कारणे... भाजप मात्र अजूनही आत्मपरिक्षणापासून दूर
भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 (ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून जगदीश ग्वालबंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालबंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सत्ताधारी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला आहे.
हेही वाचा -जनतेची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे जिल्हा परिषदेत अपयश - समीर मेघे
या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विक्रम यांना एकूण 13386 हजार मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार पंकज यांना 3750 मते पडली. या निवडणुकीत विक्रम यांचा 9336 मतांनी विजय झाला आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे नागपूरसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.