नागपूर - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (१६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.
हिवाळी अधिवेशन : मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार - BJP boycott customary tea party on winter season
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (१६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांच्या चहापाणावर भाजप बहिष्कार टाकण्याची शक्यता
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता विरोधीपक्ष नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या अधिवेशनात कोणती रणनिती असावी यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधीपक्ष बहिष्कार टाकत असल्याची परंपरा सुरु आहे. यावेळीसुद्धा ही परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.
Last Updated : Dec 15, 2019, 3:04 PM IST