नागपूर -नागपूर जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायत ( Nagpur Gram Panchayat Result ) निवडणूक निकाल जाहीर ( Gram Panchayat Election Results Announced ) झाले आहेत. यामध्ये भाजपला सहा जागा तर, काँग्रेसला सहा जागेवर यश मिळाले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) गटाला एका ग्रामपंचायतमध्ये आपला सरपंच निवडणू आणण्यात यश मिळाले आहे.
Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप,काँग्रेसला प्रत्येकी सहा ठिकाणी यश - Gram Panchayat Election Results
नागपूर जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायत ( Nagpur Gram Panchayat Result ) निवडणूक निकाल जाहीर ( Gram Panchayat Election Results Announced ) झाले आहेत. यामध्ये भाजपला सहा जागा तर, काँग्रेसला सहा जागेवर यश मिळाले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) गटाला एका ग्रामपंचायतमध्ये आपला सरपंच निवडणू आणण्यात यश मिळाले आहे.
दोन ग्रामपंचायतमध्ये सरपंचांनी निवडणूक बिनविरोध झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, रामटेक आणि कुही तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतमध्ये सरपंचांची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली होती. आज निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपसह काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर होम ग्राउंडवर विजयाचे मोठे आवाहन निर्माण झाले होते,त्याच बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती तर काँग्रेस कडून माजी मंत्री सुनील केदार राजेंद्र मूळक, राजू पारवे यांच्या सुद्धा प्रतिष्ठेची परीक्षा होती. आजच्या निवडणूकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी सहा सरपंच निवडून आल्याने हा सामना बरोबरीत सुटला आहे.
तीन तालुक्यात भाजप काँग्रेस -तीन तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी निवडणुका झाल्या आहेत. कुही तालुक्यात आठ,भिवापुर तालुक्यात सहा तर रामटेक तालुक्यात तीन ग्रामपंचायतचा समावेश आहे. 17 पैकी भाजपला 6 काँग्रेसला 6,अपक्ष 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 1 आणि 2 बिनविरोध झाल्या आहेत.Conclusion: