महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरमधून ९ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज; प्रमुख दावेदारांचे अर्ज सोमवारी

शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नागपूरमधून ९ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज

By

Published : Mar 23, 2019, 11:52 PM IST

नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा अर्ज सादर करण्याकरता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून केवळ २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अजूनही उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.

नागपूरमधून ९ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज


लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशित अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजता पूर्ण केली जाणार आहे. नागपुरातून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी अजूनपर्यंत नाम निर्देशन पत्र सादर केलेले नाही. ते शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत अपक्ष उमेदवार मनोज बावणे, प्रभाकर सातपैसे, आंबेडकर राइट्स पार्टी ऑफ इंडियाचे अॅड. विजया बागडे यासह बहुजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विदर्भ निर्माण महामंचचे अॅड. सुरेश माने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदारसंघात चंद्रभान रामटेके हे राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत, तर भाकपकडून कॉम्रेड बंडू मेश्राम हे देखील निवडणूक लढणार आहेत.


शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशित अर्ज स्वीकार केले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना सोमवारी निवडणुकीचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. सकाळी नऊ ते ३ यावेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून त्यानंतर नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना सोमवारी घाई करावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details