महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्यांनी' राज्यसभेची तयारी करावी, लोकांमधून ते निवडून येणार नाहीत - नाना पटोले - loksabha election

नितीन गडकरी यांनी राज्यसभेची तयारी करावी, त्यांना जनाधार राहिला नाही, आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची गडकरींंवर बोचरी टीका. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाईक रॅली काढत केले शक्तीप्रदर्शन.

नाना पटोले

By

Published : Apr 9, 2019, 3:21 PM IST

नागपूर- आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ नागपूर शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नितीन गडकरी यांनी राज्यसभेची तयारी करावी,त्यांना जनाधार राहिला नाही,असा टोला यावेळी गडकरींना लगावला.

नाना पटोले दुचाकी रॅली दरम्यान बोलताना

पहिल्या टप्प्यातील नागपूर व रामटेक लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळी ९ वाजता सीताबर्डी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाना पटोले यांनी बाईक रॅली काढली.

आतापर्यंतच्या काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील घेण्यात होती. माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य काँगेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके,राष्ट्रवादीचे छगन भुजबळ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या सभा यावेळी नागपूर व रामटेक लोकसभा क्षेत्रात घेण्यात आल्या आहेत.

यावेळी नाना पटोले यांनी भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करू, असा विश्वास दाखविला. नितीन गडकरी यांनी राज्यसभेची तयारी करावी, असे 'ईटीव्ही'शी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details