महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धापेवाड्याच्या महालक्ष्मी कापूस जिनिंगला आग, लाखोंचे नुकसान - nagpur fire news

जिनिंगच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर माकडाने उड्या मारल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला शेतकरी आणि मजुरांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केले. यानंतर अग्निशामक दलाला पाचारण केले.

धापेवाड्याच्या महालक्ष्मी कापूस जिनला आग
धापेवाड्याच्या महालक्ष्मी कापूस जिनला आग

By

Published : May 16, 2020, 11:50 AM IST

नागपूर - धापेवाडा येथील महालक्ष्मी कापूस जीनला अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी सावनेर, खापा, कळमेश्वर व मोहपा येथून अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, अजूनही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही.

धापेवाड्याच्या महालक्ष्मी कापूस जिनला आग

प्राथमिक माहितीनुसार, जिनिंगच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर माकडाने उड्या मारल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला शेतकरी आणि मजुरांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीचे रौद्र रूप पाहता आग विझवण्यासाठी सावनेर, खापा, कळमेश्वर व मोहपा या ठिकाणांवरून अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान आणि उपस्थित लोक आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details