नागपूर - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली. सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भांत आयोजित 'संवैधानिक जागर' कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाची तक्रार - CAA
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात देशातील ६१ संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस सेक्युलिरझम अँड डेमोक्रॅटिक' नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेने दोन दिवसांपूर्वी नागपुरच्या जाफर नगरच्या इदगाह मैदानात सभा आयोजित केली होती.

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाची तक्रार
माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाची तक्रार
हेही वाचा -'लवकरच कमळाच्या पाकळ्या गळतीला सुरुवात'
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात देशातील ६१ संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस सेक्युलिरझम अँड डेमोक्रॅटिक' नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेने दोन दिवसांपूर्वी नागपुरच्या जाफर नगरच्या इदगाह मैदानात सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना कोळसे पाटील यांनी वाजपेयींबाबत खालच्या स्तरावर टीका केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपुर शहराध्यक्ष शिवानी दाणी यांनी केला आहे.