महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला विदर्भाबद्दल चर्चा करायची नाही का? भाई जगताप यांचा सवाल - नागपूर जिल्हा बातमी

आज दुसऱ्या दिवशी 289 अंतर्गत पहिल्यांदा कोण बोलणार यावरून गोंधळ सुरू झाला. ते पूर्णवेळ कामकाज तहकूब होईपर्यंत कामकाज थांबले.

भाई जगताप
भाई जगताप

By

Published : Dec 17, 2019, 10:22 PM IST

नागपूर- हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानपरिषदेत कामकाज ठप्प झाले. विदर्भाच्या सिंचन, मिहान, बेरोजगारी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर 260 अंतर्गत प्रस्ताव सुरू असतानाच कामकाज बंद पडले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ द्यायची नाही का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाई जगताप, काँग्रेस नेते

हेही वाचा - कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे

आज दुसऱ्या दिवशी 289 अंतर्गत पहिल्यांदा कोण बोलणार यावरून गोंधळ सुरू झाला. ते पूर्णवेळ कामकाज तहकूब होईपर्यंत कामकाज थांबले. ज्या प्रकारे गोंधळ घातला तो विधान परिषदेच्या कारभाराला शोभणारा नाही. आम्ही विरोधात असताना, असे केले नाही, असे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : सभागृहात जे घडलं ते निंदनीय - सुधीर मुनगंटीवार

वरच्या सभागृहाची एक गरिमा आहे, ती गरिमा पाळण्यात न आल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्री हे सरकारच्या वतीने बाजू मांडायला उठले. त्यावेळी विरोधकांनी शिमग्यासारखा प्रकार केला, असे जगताप यांनी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details