नागपूर : सर्वांगीण दृष्टी, ठेवून पायाभूत सुविधांचा विकास ( Infrastructure development ) करणे हे सरकारचे लक्ष आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी केले आहे. ते आज नागपूरात विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा ( new direction for development of Maharashtra ) मिळेल.
शॉर्टकटचा अवलंब करणारे राजकीय नेते देशाचे शत्रू - प्रकल्प राज्यातील पायाभूत सुविधांचे समग्र दर्शन देतात. राज्यातील तसेच केंद्रातील सरकार वेगाने काम करीत असल्याचा हा पुरावा आहे, असे ते म्हणाले. शॉर्टकटचा अवलंब करणारे राजकीय नेते देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवण्याचे ध्येय ठेवणारे सरकार बनवू शकत नाहीत. मी त्यांना विकासाचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन करतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासाला चालना :समृद्धी महामार्ग, ( Balasaheb Thackeray Samriddhi Highway) दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आदी पायभूत सुविधाच्या विकासामुळे राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन समन्वित अंमलबजावणीच्या दृष्टीला समर्थन देत अजिंठा, एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना समृद्ध करण्यास मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरणार असेही पंतप्रधान म्हणाले.
समृद्धी महामार्ग जर्मनीच्या ऑटोबहन्सपेक्षा सरस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरात रविवारी 1 हजार 500 कोटींहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन पार ( Inauguration of Samriddhi Highway in Nagpur ) पडले. तसेच नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जर्मनीच्या ऑटोबहन्सपेक्षा सरस ( CM Ekanth Shinde on Samriddhi Highway in Nagpur) ठरेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.