नागपूर -नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी विद्यापीठाच्या परिसरात जाऊन मारहाण केली. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे दिले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. हा लाठीमार निंदनीय आहे असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन - महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक
नागरिकत्व विधेयक बिल पास करण्यात आले, ही संविधानाची अवहेलना आहे. तसेच मंजूर करण्यात आलेल्या या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थांवर लाठीचार्ज करणे निंदनीय आहे. विरोध करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना नाही काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. नागपुरच्या वेरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मोदी सरकार विरोधात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते.
हेही वाचा - 'भाजपचा नेहमीच नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगावण्याचा प्रयत्न'