नागपूर - सावनेर तालुक्यातील बडेगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. गावातील पाणी पुरवठा योजनेतील नळाला पाणी येत नाही, या तक्रारीच्या निराकरणासाठी हा कर्मचारी गेला होता. त्यावेळी पीडित महिलेच्या घरी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार खापा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
तक्रारीचे निवारण करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा महिलेवर बलात्कार - बडेगाव महिला लैंगिक अत्याचार न्यूज
बडेगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. ग्रामपंचायत कर्मचारी भुजंग समदुकर हा पाणी तक्रार निवारणासाठी पीडित महिलेच्या घरी गेला होता. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
पीडित महिला तिची आई गावाबाहेर गेल्यामुळे घरी एकटीच होती. ग्रामपंचायत कर्मचारी भुजंग समदुकर हा पाणी तक्रार निवारणासाठी पीडित महिलेच्या घरी गेला होता. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पीडितेने खापा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली.
तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर लावल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. जोपर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवला तोपर्यंत आरोपी गावातून फरार झाला होता. त्यामुळे या घटनेत पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे आरोपीला पळ काढण्यास संधी मिळाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.